कोथरुड

कोथरूड येथील छत्रपती संभाजी विद्यालय येथे लसीकरण केंद्र सुरु करा : ॲड.योगेश मोकाटे

कोथरुड : कोथरुड मध्ये असलेल्या लसीकरण केंद्रावर  लस घेण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोथरुड च्या लोकसंख्येचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकातील  म.न.पा. च्या छत्रपती संभाजी विद्यालयात लसीकरण केंद्र  सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक, शिवसेना कोथरुड विधानसभा प्रमुख ॲड.योगेश मोकाटे यांनी केली आहे. Start Vaccination Center at Chhatrapati Sambhaji Vidyalaya at Kothrud: Adv. Yogesh Mokate

या संदर्भातील निवेदन पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांना देण्यात आले आहे. सध्या कोरोना प्रतीबंधात्मक लसीचा उपक्रम कोथरूड मधील अनेक केंद्रांवर सुरु आहे. परंतु कोथरूड उपनगरातील लोकसंख्या लक्षात घेता या केंद्रावर मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रतिबंध होण्याऐवजी वाढायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणखी केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे मोकाटे यांनी म्हंटले आहे.

IMG 20210223 WA0156

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकातील  म.न.पा. च्या छत्रपती संभाजी विद्यालयात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळे सामाजिक अंतर राखणे सुद्धा शक्य होईल. अनेक नागरीकांना जाण्या येण्यासाठी हि जागा अत्यंत सोयीस्कर आहे. तसेच प्रबोधन विचारधारा संस्थेचे स्वयंसेवक या ठिकाणी आपल्याला विनामूल्य मदत करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी
ॲड.योगेश मोकाटे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये