महाराष्ट्र

पुणे – मुंबईसह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम

मुंबई : राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.

मतदानाची तारीख – 15 जानेवारी

मतदानाचा निकाल – 16 जानेवारी

27 महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Img 20251125 wa00126624322614302660332

राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचं हमी पत्र द्यावी लागेल. नाही दिलं तर निवड रद्द होईल.

राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्याबाबत कार्यवाही केली आहे असेही सांगण्यात आले आहे. राज्यातील २९ महापालिकेबाबतची पत्रकार परिषद आहे. २७ची मुदत संपली आहे. जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत, त्यांचीही निवडणूक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये