कोथरुड

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या भरारी पथकाची दमदार दंडात्मक कारवाई ; ७६ हजार रुपये दंड वसूल

कोथरूड : pune Kothrud कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दमदार भरारी पथकाने’ प्लास्टिक विक्री करणारे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ्ता परवणारे तसेच धूळ व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत दंड वसूल केला. Strong punitive action by “Bharari Squad” of Kothrud Bavdhan Regional Office; collect 76 thousand rupees fined

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “दमदार भरारी पथक” या नावाने पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकात दोन टिमची विभागणी करून एक वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, चार आरोग्य निरिक्षक व दोन मोकादम यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Img 20240202 wa00065471036658024132435

या पथकाने दि. १ फेब्रुवारी २०२४ पासून प्रभाग क्रं. १०,१२ मध्ये डहाणूकर कॉलनी, कोथरूड गांवठाण, गुजरात कॉलनी, वृंदावण कॉलनी, सुतार दवाखाना शास्त्री नगर, गाढवे , भुसारी कॉलनी, बावधन गांवठाण आदी परिसरात धडक कारवाई सुरू केली आहे. वरील परिसरातील भाजीमंडईतील भाजी विक्रेते, हॉटेल, बेकऱ्या, दारूचे दुकाने, उपहारगृहे, खानावळी, फळविक्रेते, हारविक्रेते तसेच ठोक प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या ३ व्यवसायिकांना प्रत्येकी पाच हजार असे एकूण १५ हजार रुपये तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्या २२ नागरिकावर प्रत्येकी ५००/- प्रमाणे एकूण ११ हजार रुपये तर धूळ, ध्वनी प्रदुषण करून मार्बल फरशी विक्री करणाऱ्या एक व्यवसायिक यांना ५० हजार असे सर्व व्यवसायिकांवर गांधीगिरीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करत ७६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Img 20240202 wa00038780336856993133107

या पथकाच्या माध्यमातून वस्ती पातळीवर जाऊन सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. या दमदार भरारी पथकाने केलेली कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, विभागीय कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त संतोष वारूळे, महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शना खाली व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Img 20231112 wa00053541767882370111537

या पथकातील आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, हणुमंत चाकणकर, संतोष ताटकर, सुरज पवार मोकादम वैजीनाथ गायकवाड, राम गायकवाड यांनी दंडात्मक कारवाई करून ६५० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे.

यावेळी प्लॅस्टिक न वापरणाऱ्या जबाबदार व्यवसायिकांचा पथकाच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. हे करत असताना वरिष्ठ आरोग्य निरिक्षक यांनी “पुणे शहरात अस्वच्छता करणे, लघूशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, राडारोडा टाकणे, पोस्टर लावून शहर विद्रूप करणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, प्लॅस्टिक वापरणे, सोसायट्यांनी ओला कचरा न जिरविणे अशाप्रकारे महानगरपालिकेच्या नियमाचे पालन केले नाही तर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई तिव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुणे शहराला स्वच्छ भारत आभियानात एक नंबर आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Img 20240202 wa00026157599793110144537

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये