पुण्यात कर्वेनगरमध्ये ‘या’ ठिकाणी होणार राणादा पाठकबाईंचं लग्न

पुणे : सिनेमा, मालिकांमधून आनंदी नवरा बायको साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार झाल्याच्या घटना विरळच आहेत. अशीच एक लोकप्रिय मराठमोळी जोडी लवकरच पुण्यातील कर्वेनगर येथे विवाहबद्ध होत आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही ती लोकप्रिय जोडी आहे.
सध्या या दोघांच्याही लग्नाची धामधूम पुण्यात आणि कोल्हापूरमध्ये सुरू आहे. लग्नसोहळा पुण्यात होणार असला तरी हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नाचे ड्रेस, साडी खास कोल्हापुरातून मागवण्यात येणार आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिका केल्या होत्या. दोघांचीही मुख्य भूमिका असलेली ही पहिलीच मालिका होती. ही मालिका कमालीची लोकप्रिय ठरली. या मालिकेमुळे हे दोन्ही कलाकार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.
या मालिकेत सहकलाकार म्हणून काम करताना हार्दिक आणि अक्षयाची छान मैत्री झाली. हार्दिकने मित्र म्हणून अक्षयाला तिच्या ब्रेकअपच्या काळात खूप आधार दिला. अक्षया हार्दिकच्या नव्हे तर दुसऱ्याच एका अभिनेत्याच्या आधी प्रेमात होती. त्यांचे एकत्र फोटो ती शेअर करत होती. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत नुकतीच लग्न करणार असल्याची बातमी दिली होती. ते कधी आणि कुठे लग्न करणार याची आता चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘सिंहासन न्यूज’च्या वाचकांना आम्ही आज याबाबतची माहिती देणार आहोत.

अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाचे स्थळ पुणे असणार आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचं लग्नं जिथे झालं तिथेच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यासाठी विराजस आणि शिवानीसोबत त्यांनी चर्चाही केली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म्स या ठिकाणी विराजस आणि शिवानीने लग्नगाठ बांधली होती याच ठिकाणी आता अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लग्न करणार असे त्यांनी सांगितले आहे.


