महाराष्ट्रराजकीय

विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंचं एकमत – उदय सामंत


मुंबई : विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम आहोत. बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली आहे, तसेच विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत. यावर सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंचं एकमत आहे. बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

यासंदर्भात दोन दिवसात (2 सप्टेंबर रोजी ) आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून मुदतवाढीसाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना कमी त्रास देऊन घरातल्या घरात परीक्षा देता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सामंत म्हणाले.

अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन संचालक सुद्धा या समितीत आहेत. या समितीची आज पार पडलेल्या बैठकीत बहुतांश विद्यापीठांच्या कुलगुरुंनी परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

परवा 12 वाजता कुलगुरुंची बैठक होणार आहे. तसंच समितीची बैठक चार वाजता होईल. त्यानंतर जो निर्णय होईल तो शासनासमोर मांडण्यासाठी शेवटची बैठक घेऊ,” असं उदय सामंत यांनी सांगितलं.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये