पुणे शहर

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तर्फे कोथरुडकरांची दिवाळी होणार गोड

अतिशय नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध

कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांची दिवाळी गोड होणार असून, अतिशय नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनावर नियंत्रणासाठी देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर  पाटील यांनी आपल्या मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. यामध्ये अतिशय नाममात्र शुल्क आकारुन पोळी-भाजीची व्यवस्था करणे, वयोवृद्धांना २५% सलवतीच्या दरात औषधे देणे.

त्याबरोबरच हॅंड सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. त्याच धर्तीवर कोथरुडकरांची दिवाळी गोड करण्यासाठी पाटील यांनी पुढाकार घेतला असून, १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारुन दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे.

Img 20201024 wa0166 1
Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये