वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करत सुजाता झंजे व शोभा वांजळे यांचा ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न..

वारजे : वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुजाता दत्ता झंजे व शोभा राहुल वांजळे यांनी आपला वाढदिवस आनोख्या पद्धतीने वृद्धाश्रमात साजरा केला.
वारजे माळवाडी मधील काँग्रेसचे दत्ता झंजे यांच्या पत्नी सुजाता दत्ता झंजे तसेच उद्योजक राहुल वांजळे यांच्या पत्नी शोभा राहुल वांजळे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला आहे. सुजाता झंजे व शोभा वांजळे यांनी आपला वाढदिवस शांतिबन वृद्धाश्रमाच्या खानापूर, सिंहगड रोड, डोणजे, उत्तमनगर, वारजे, शिवणे, कोंढवे धावडे या ७ ठिकाणी सकाळचा नाष्टा आणि स्नेह भोजन देऊन साजरा केला.
या सर्व वृद्धाश्रमात एकूण ३०० ते ३५० वृद्ध आहेत.
आज झंजे व वांजळे यांनी त्यांचा वाढदिवस वृद्धआश्रमात साजरा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

वृद्ध लोकांमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहून समाधान वाटले. आपल्या रक्ताच्या नात्यांनी दूर ठेवले असले तरी त्यांच्या आठवणीत हे वृध्द आपले जीवन जगत असतात पण अशा वेगळ्या उपक्रमांनी त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असतो, असे मत सुजाता झंजे यांनी व्यक्त केले.
यावेळी शांतिबन आश्रमाच्या संस्थापिका अनिता देवकर, दत्ता झंजे, राहुल वांजळे, राजकुमार गुप्ता अमित देवकर आदी उपस्थित होते.



