पुणे शहर

कर्वेनगरमधील मातोश्री वृद्धाश्रम चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वप्नील दुधाने यांचा मास्टर प्लॅन.. अधिकाऱ्यांनी आज तातडीने केली पाहणी

कर्वेनगर : कर्वेनगर मधील मातोश्री वृद्धाश्रम चौक परिसरात होणारी रोजची वाहतूक कोंडी कर्वेनगर तसेच सिंहगड रस्त्याने राजाराम पुलावरून या चौकात येणाऱ्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणी वाहतूक विभाग, पालिका प्रशासन यांच्याकडून आतापर्यंत केले गेलेले उपाय अपयशी तर ठरतच आहेत पण या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडीत जास्तच भर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मातोश्री वृद्धाश्रम चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी या चौकात शिवणे खराडी रस्त्यावरील १०० फुटी डीपी रस्त्यावर उड्डाण पुलाची मागणी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी केल्यानंतर आज तातडीने आयुक्तांच्या आदेशाने या चौकाची पाहणी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.

Img 20251114 wa00095929114301741980474

यावेळी पथ विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भूतडा,  प्रकल्प विभागाचे श्रीकांत गायकवाड,  पथ विभागाचे उपअभियंता केदार वझे, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता पियुष भोंडे यांनी प्रत्यक्ष जागेवर मातोश्री वृद्धाश्रम चौक परिसराची पाहणी केली या प्रसंगी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थीचे गांभीर्य अधिकारी वर्गाच्या लक्षात आणून दिले.

स्वप्नील दुधाने म्हणाले,  मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोरील राजाराम पूल चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येत असून यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. येथे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी मनस्ताप ठरत आहे. सिंहगड रस्त्याने येणारी अनेक वाहने शहरात जाण्यासाठी राजाराम पुलावरून या चौकात येऊन डीपी रस्त्याने म्हात्रे पुलाकडे जात असतात. तर वारजे कर्वेनगर मधील वाहने स्वारगेट तसेच सिंहगड रस्ता परिसरात जाण्यासाठी या चौकात येतात.  या चौकात दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असणारे चार मुख्य रस्ते एकत्र येत असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दीचा महापूर अनुभवायला मिळत आहे. राजाराम पूल सकाळ व सायंकाळी वाहनांनी जाम झालेला असतो.  विठ्ठल मंदिराकडून येणारा रस्ता डिपी रस्त्याला जिथे मिळतो त्या ठिकाणीही वाहतुकीचा बोजवार उडालेला असतो. आतापर्यंत या समस्येवर तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रशासनाने  केलेला प्रयत्न केला निष्फळ ठरला आहे.  

Img 20250508 wa00015038950216212096978

दुधाने म्हणाले,  आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने कर्वेनगर आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधत सदर विषयावर सविस्तर चर्चा केली. नागरिकांशी चर्चा आणि विकास आराखड्याचा अभ्यास केला असता दुधाने लॉन्स, महालक्ष्मी लॉन्सकडून येणारा १०० फुटी डीपी रस्ता म्हात्रे पुलाकडे जाताना मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोरील राजाराम पूल चौकात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच ही वाहतूक सुरळीतपणे म्हात्रे पुलाकडे जाण्याकरिता उड्डाणपूल करण्याची आवश्यकता भासत आहे. याचसह कर्वेनगर ते सनसिटी सिंहगड रोड या दोन उपनगरांना जोडणाऱ्या मुठा नदीवरील उड्डाणपुलाचे काम सद्यस्थितीला ७०% पूर्ण झाले असून सदर रस्त्यावरील वाहतूक याच १०० फुटी डीपी रोडने अर्थात राजाराम पुलाकडे जाणार आहे. यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाण्याआधी सदर १०० फुटी डीपी रोडचे काम पूर्ण होणे, आवश्यक आहे.

Img 20251114 wa0005689164276922178399

परिणामी वाहनांची संख्या भविष्यात आणखी वाढणार असून सदर मातोश्री वृद्धाश्रम चौकामध्ये वाहतूक कोंडीचा ताण वाढतच जाणार आहे. भविष्यातील हा ताण आणि यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महालक्ष्मी लॉन्स समोरुन जाणाऱ्या या १००फुटी डीपी रस्त्यावरून म्हात्रे पुलाकडे जाण्याकरिता उड्डाणपूलाची आवश्यकता आहे. महालक्ष्मी लॉन्स ते गिरिजा हॉटेलच्या काही अंतर पुढे उड्डाण पूल करण्याची मागणी आम्ही केली आहे.  याबाबत मनपाचे आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली असून त्यांना  निवेदन दिले आहे.  आयुक्तांनी पथ विभागाचे मुख्य अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना सूचना दिल्यानंतर त्या अनुषंगाने आज पाहणी झाली आहे. पथविभाग, प्रकल्प विभाग या पुणे महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष मातोश्री वृद्धाश्रम येथे पाहणी करून याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

याबाबत निवेदन आणि उड्डाण पूल कसा होऊ शकतो याचा नकाशा  देत याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे अधिकारी वर्गानेही यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर विचारविनिमय केला जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

Fb img 17620776420884188237802217418510

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये