कोथरुड

कोथरूड मधील विराज डाकवे यांची मनसे शाखा लोकहिताची असेल : अमित ठाकरे

कोथरूड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे शाखा अध्यक्ष- विराज डाकवे यांच्या कोथरूड मधील पौड रोड शाखेचे उद‌्घाटन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते यावेळी या “कोथरुड शाखेचे” उद‌्घाटन संपन्न झाले.

यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर. नेते राजेंद्र वागस्कर, प्रवक्ते योगेश खैरे, गणेश सातपुते, कोथरूड विभाग अध्यक्ष सुधिर धावडे, संजय काळे, रमेश उभे, नितिन गायकवाड, गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे, अनिकेत मुरकुटे, पांडुरंग सुतार, किरण उभे, सागर शेलार, सचिन मोरे, पै.गणेश शिंदे, सुभाष दांगी, प्रफुल्ल कुडले, अभिजित चौगुले, किरण जाधव, हर्षद खाडे, किरण जोशी, आकाश बोबडे आदी उपस्थित होते.

यावेळी अमित ठाकरे यांनी शाखेत बसून विराज डाकवे यांनी केलेल्या सामाजिक कामाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेच कार्यरत रहा असे त्यांनी सांगितले. यावेळी डाकवे यांच्याकडून अमित ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली.

Img 20220801 wa0304
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये