आम्ही धर्माचा आदर करतो, जाहिरात नाही : नाना पटोले

नागपूर : आम्ही धर्माचा आदर करतो. त्याची जाहिरात करत नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना लगावला आहे. आज अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बदलण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी, महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नाहीये, हे मुद्दे अधिक महत्त्वाचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
पटोले म्हणाले. “हनुमान चालीसा वगैरे प्रश्नांमध्ये आम्हाला कुठलाही रस नाही. मी हिंदू धर्माचा आहे. मी वारंवार सांगतो. मी हनुमान चालीसा घरी वाचतो. आमचा धर्म आमच्या आस्थेचा विषय आहे. आम्ही धर्माचा आदर करतो. त्याची जाहिरात करत नाही.”
“खासदार नवनीत राणा यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल आणि फक्त हाच प्रश्न महत्त्वाचा आहे असे वाटत असेल, आज अनेक महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत. केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बद्दलवण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी, महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नाहीये, असेही पटोले म्हणाले.




