पुणे शहर

उद्योजक संजय भोर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो याची जाणीव ठवून काम करणाऱ्या उद्योजकांपैकी एक असणारे भोर इंडस्ट्रीजचे संचालक, शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष संजय भोर यांचा वाढदिवस एका सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०१ जणांनी रक्तदान करत आपले समाजाप्रती असणारे कर्तव्य बजावले.

शिवणे येथे भोर इंडस्ट्रीजच्या आवारात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुबी हॉल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शिवणे, उत्तमनगर, वारजे, कर्वेनगर, कोथरूड तसेच पुणे जिल्ह्यातून औद्योगिक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत संजय भोर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

उद्योग व्यवसायात यशस्वी असतानाच समाजाप्रती असणारी आपली कर्तव्य न विसरता संजय भोर हे सामाजिक काम करत आलेले आहेत. कोरोना सारख्या संकट काळातही त्यांनी कामगार वर्ग, नागरिक यांच्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत मदत केली होती. म्हणूनच पुणे जिल्ह्यात समाजभिमुख उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

संजय भोर म्हणाले रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे “करुन दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये