सिनेजगत

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट कचरा, त्यामुळे भारताचा अपमान होईल : कॅनडाच्या दिग्दर्शकाचं वक्तव्य

मुंबई : ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट केवळ तिरस्कार पसरवतो. कलात्मकतेच्या नावाखाली हा सगळा कचरा आहे. जर हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला तर त्यामुळे भारताचा अपमान होईल, असे ट्विट कॅनडाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी केले. काही वेळाने त्यांनी आपलं ट्वीट डिलीट केलं. मात्र याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Fb img 1660826211446

एस एस राजामौली यांचा चित्रपट RRR ऑस्करला जावा अशी इच्छा अनुराग कश्यपने व्यक्त केल्यानंतर ‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर संताप व्यक्त केला होता. अनुराग कश्यपच्या ट्वीटवर विवेक अग्निहोत्री यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्यानंतर कॅनडाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी अनुराग कश्यपला समर्थन देत एक ट्वीट केलं. विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट रिट्वीट करत त्यांनी म्हटलंय, “हो कारण ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट केवळ तिरस्कार पसरवतो. कलात्मकतेच्या नावाखाली हा सगळा कचरा आहे. जर हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला तर त्यामुळे भारताचा अपमान होईल. अनुराग कश्यप केवळ या सगळ्यापासून देशाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.” 

Fb img 1660803986582

काही दिवसांपूर्वीच अनुराग कश्यपच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये अनुरागने RRR चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. अनुरागच्या मते यावर्षी जर भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून जर RRR या चित्रपटाला पाठवलं तर त्याला ९९% नामांकन मिळू शकतं. शिवाय ज्यापद्धतीने भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाहिलं आहे त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या दृष्टीकोनातून परदेशी लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे असं अनुरागचं मत आहे. त्याच्या या वक्तव्यावरच सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.

Fb img 1660745320845
Amrutmahotsav 600x600 1
Img 20220804 wa0019951227047229036961
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये