पुणे शहर
पुण्यातील साने गुरुजी मंडळाच्या देखाव्याला आग, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असताना घडली घटना. आग आटोक्यात, कोणीही जखमी नाही

पुणे : आंबील लोढा कॉलनी जवळील साने गुरूजी नगर येथे एका गणपती मंडळाने महाकाल मंदिराची सजावट केलेल्या प्रतिकृतीच्या कळसाच्या वरील बाजूस अचानक काही वेळा पूर्वी आग लागली. याठिकाणी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असताना डेकोरेशनच्या कळसाला अचानक आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. जे पी नड्डा हे सुखरूप तेथून बाहेर पडलेले आहेत.













