कोथरूडमध्ये मनसेला धक्का ; मंदार बलकवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपचे बेरजेचे राजकारण सुरू
पुणे : pune Kothrud महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मंदार बलकवडे Mandar Balkawade यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bavankule व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील chandrakant Patil यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. बलकवडे यांचा भाजप प्रवेश मनसेला धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे शहर व कोथरूडमध्ये भाजपने बेरजेचे राजकारण सुरू केले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मंदार बलकवडे यांचा कोथरूड व पुणे शहरात दांडगा जनसंपर्क आहे. शहराच्या प्रत्येक भागात त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. सातत्याने सामाजिक उपक्रम घेत त्यांनी जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग १३ एरंडवणा, प्रभात रोड भागातून निवडणूक लढवली होती. भाजपचे वातावरण असतानाही त्यांनी लक्षवेधी मते मिळवली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचे पदाधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे बलकवडे यांचा भाजप प्रवेश मनसेसाठी धक्का तर भाजपसाठी फायदेशीर मानला जात आहे.
कोथरूडमध्ये भाजपची ताकद असली तरी भाजप इतर पक्षातील वजनदार पदाधिकारी आपल्या पक्षात घेऊन बेरजेचे राजकारण करत असल्याचे मंदार बलकवडे यांच्या पक्ष प्रवेशावरून दिसत आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका अशा निवडणुका येणाऱ्या वर्षात होणार आहेत आणि त्या दृष्टीने भाजपकडून बांधणी चालली असल्याचे दिसत आहे.
मंदार बलकवडे यांच्या प्रेवेशावेळी प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते

पक्ष प्रवेशाबाबत मंदार बलकवडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पक्ष प्रवेश केला आहे. देशाची वेगाने प्रगती करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार आल्याचे त्यांनी सांगितले.









