पुणे शहर
भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी सचिन फोलाने

पुणे : भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी सचिन फोलाने यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फोलाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे भीमराव तापकीर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, माजी आमदार योगेश टिळेकर, उद्योजक समीर पाटील, उदय कड, शशिकांत कांबळे, रितेश वैद्य आदी उपस्थित होते.
पक्षाच्या माध्यमातून काम करताना मिळालेली प्रत्येक जबाबदारी पार पडली आहे. पक्षाने विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली असून या पदाच्या माध्यमातून काम करताना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे फोलाने यांनी निवडीनंतर सांगितले.







