कोथरुड

५० गणेश मंडळांना सुतार यांच्याकडून सॅनिटायझर स्टँन्ड

कोथरुड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील पन्नास  सार्वजनिक गणेश मंडळांना पुणे  महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते,नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) यांच्या सहकार्याने सॅनिटायझर स्टँन्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना सुतार म्हणाले, गणेश मंडळाच्या माध्यमातून तरुण मुले सामाजिक कार्यात जोडले जातात. केवळ गणेशोत्सव कालावधीतच नाही. तर वर्षभर मंडळाचे कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. कोरोना च्या काळातही सामाजिक बांधिलकीचे दर्शन कार्यकर्त्यांकडून दिसत आहे.

या प्रसंगी बाळु मोहोळ, किरण मोहोळ, विकास मोहोळ, ऋतिक भोसले, अक्षय कोथमिरे, शुभम फांदे, रवी ढमाले, संतोष बानगुडे, मुकुंद भेलके, दत्ता सुतार,मनोज आल्हाट, रणजित बोराटे, ओंकार सुतार,रोहन गलांडे, दिपक कुल, अभिषेक खोमणे, तेजस मुळीक, प्रसाद गौड, रिंकेश पोळेकर, विशाल आल्हाट हे विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर वरघडे,अनिल भगत, सुमित माथवड, योगेश क्षीरसागर, प्रसाद नारकर, नितीन दुबळे, अजय डहाळे,भूषण माथवड यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये