कर्वेनगरमध्ये मोरया मित्र मंडळाने दिपोत्सवातून केली मतदानाबाबत जनजागृती

कर्वेनगर : कर्वेनगरमधील मोरया मित्र मंडळाच्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून मतदानाचे बोध चिन्ह साकारुन मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, चांगला रोजगार, महिला सुरक्षितता यासाठी मतदान करा .VOTE for Better Maharashtra चा संदेश देण्यात आला.

ऐश्वर्या जाधव, दिव्या दानवले, संचिता काळे, नेत्रा नायकवडी , स्वरा पडवळ यांनी मतदानाबाबत जनजागृती करणारी रांगोळी साकरली होती. रांगोळी भोवती ५०१ दिव्यांची आरास करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समोर विजय खळदकर व मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिपोत्सवला सुरवात करण्यात आली.



यावेळी मोरया मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, उपाध्यक्ष रोहित दानवले, कार्याध्यक्ष अक्षय केसवड, ऋषीकेश जगताप, गणेश शिंदे, सुरेखा जोशी, पोर्णिमा केसवड, सुशीला नालगुडे, सोनाली मारणे, रेणुका जावळे, स्वाती दारवटकर आणि मंडळाचे सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी मारणे म्हणाले मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. माझ्या एका मताने काय होणार? हा विचार मनातुन काढुन सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून सर्वांनी मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.















