पुणे शहर
अमोल केदारी आणि अक्षय गोडसे यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवड

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्त पदी अमोल दत्तात्रय केदारी आणि अक्षय अशोकराव गोडसे यांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली.
अमोल केदारी हे सुवर्णयुग बॅंकेमध्ये शाखाधिकारी असून सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून २५ वर्षे कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. अक्षय गोडसे हे सुवर्णयुग तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष असून मागील २० वर्षे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्यात सहभागी आहेत. अक्षय गोडसे हे हाॅटेल व्यावसायिक आहेत.

अमोल केदारी



अक्षय अशोकराव गोडसे






