आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ; लहुजींचे भव्य राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याचा निर्धार…

पुणे : आद्य क्रांतिगुरू सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांचा १४१ व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीच्या वतीने संगमवाडी पुणे येथील समाधी स्थळी विनम्र अभिवादन करण्यात आले.
आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचे प्रेरणास्थान व प्रतिक आहेत. संगमवाडी येथील लहुजींच्या समाधीस्थळी समस्त मातंग समाज व लहूभक्त मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी आज एकत्र आले होते.
यावेळी लहूजींच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन शासकिय समितीने निर्धार व्यक्त केला की, सकल मातंग समाज व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन लहुजींचे भव्य राष्ट्रीय स्मारक निर्माण केले जाईल.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीचे शासकीय समितीचे अध्यक्ष विजय डाकले व सर्व सदस्य, शांतीलाल मिसाळ, बाळासाहेब भांडे, रामभाऊ कसबे, रवी पाटोळे आणि राजू अडागळे आदी उपस्थित होते.




