पुणे शहर

पुण्यातील मार्केटयार्ड येथील गोडाऊनला भीषण आग

पुणे : मार्केटयार्ड येथे मध्यरात्री गोडाऊनमध्ये आगीची घटनाघडली आहे.रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. मार्केट यार्ड परिसरात सर्वदूर धुरांचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाकडून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साहय्याने कुलूप तोडत चारही बाजुंनी पाण्याचा मारा केला. गोडाऊनमध्ये कोणीही नागरिक अडकल्याची माहिती घेत त्यांनी पाण्याचा मारा सुरु केला. आग पसरु नये, याची जवानांनी काळजी घेतली आणि तासाभरात आग आटोक्यात आणली होती. यावेळी गोडाऊनमधे असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले. घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. आगीचे कारण समजू शकले नाही.

मार्केड यार्ड परिसरात पुण्यातील मोठी बाजारपेठ आहे. अनेक गोडाऊनदेखील आहेत. सगळे गोडाऊन एकमेकांना लागून असल्याने आगीची घटना घडली की आग पसरण्याचा मोठा धोका असतो. त्याच प्रमाणे बाजारपेठ असल्याने गोडाऊनमध्ये टेम्पोदेखील ठेवले असतात. काल लागलेल्या आगीमुळे टेम्पोही जळून खाक झाले आहेत. यात गोडाऊन मालकाचं मोठं नुकसान झालं आहे.रात्री या गोडाऊनला आग कशामुळे लागली याचं कारणं अजूनही समजू शकलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543
Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये