महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काल नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड निश्चित मानली जात होती. काँग्रेसचे इतर नेतेही प्रदेशाध्यक्ष पदासाठी रेस मध्ये होते पण पक्ष श्रेष्ठींनी पटोले यांच्या नावाला पसंती दिली आहे. Nana Patole elected as State President of Maharashtra Congress
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. काल त्यांनी आचनक राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या होत्या.
एकेकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भात पक्ष कमजोर झाला असल्याने विदर्भात पुन्हा उभारी घेण्यासाठी विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे राजकीय वर्तुळात आता बोलले जात आहे. नाना पटोले यांच्याकडे संयमी पण आक्रमक नेते म्हणून पाहिले जाते. भाजपची लाट असताना खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडल्याने पटोले चर्चेत आले होते.

आता नाना पटोले यांच्या दिमतीला ६ कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय १० उपाध्यक्षांची फौजही असणार आहे.
कार्यकारी अध्यक्ष
शिवाजी मोघे (यवतमाळ), बसवराज पाटील (उस्मानाबाद) नसीम खान (मुंबई),कुणाल पाटील (धुळे), चंद्रकांत हंडोरे (मुंबई), प्रणिती शिंदे (सोलापूर),
काँग्रेसचे उपाध्यक्ष
शिरीष चौधरी (जळगाव), रमेश बागवे (पुणे), हुसैन दलवाई (मुंबई), मोहन जोशी (पुणे), रणजीत कांबळे (वर्धा), कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद), बी. आय. नगराळे, शरद अहेर (नाशिक), एम. एम. शेख (औरंगाबाद),माणिकराव जगताप (रायगड)






