पुणे शहर

विसर्जन हौद प्रकरणी महापौरांनी लक्ष घालावे: मनसेची मागणी


पुणे : विसर्जन हौदाच्या निमित्ताने पुण्यामध्ये एक वाद निर्माण झालेला आहे. विसर्जन हौद कचऱ्याच्या कंटेनरमध्ये तयार केल्याची बाब कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे.
पुणे महानगरपालिकेने चक्क कचरा कंटेनर पासून विसर्जन हौद तयार केले आहेत. या कचरा कंटेनरला स्टिकर लावुन सजवण्यात आले असल्याची बाब मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गणेश विसर्जन बंद पाडलेले आहे.
महापौरांनी या प्रकरणी लक्ष घालून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये