पुणे शहर

पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने आदा करा, आदी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सूस खिंड उड्डाणपुलाची पाहाणी पाटील यांनी आज करुन आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Fb img 1647413711531

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, राजेंद्र मुठे, वाहतूक शाखेचे श्रीनिवास बोनाला राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम, अधिकारी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पाषाण -सूस मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सूस खिंड उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असून, या उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले, तरी सेवा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यासोबतच सूस भागातील गार्बेज प्लांटच्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पाटील यांनी सदर उड्डाणपुलाची पाहाणी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये