पुणे शहर

गुन्हेगारीमुक्त पुणे शहरासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात शैक्षणिक आणि आयटी उद्योगाच्या भरभराटीमुळे देशभरातून पुण्यात राहण्यास येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्यावाढी सोबतच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत असून गुन्हेगारीमुक्त पुणे शहरासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे. 

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून  आज देण्यात आले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना रोडरोमियांचा त्रास होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत असल्याने ऑफिसेस व महाविद्यालये सुटतेवेळी मार्शलच्या माध्यमातून ग्रस्त घालण्यात यावी, कोयतागँग सारख्या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Img 20231109 wa001228129905032016030159557

शहरात अनेक भागांमध्ये अवैद्य हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू असल्याने आजची युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शहरात खुलेआमपणे मसाज सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य केले जाते, ऑनलाइन गेम पार्लर, जुगार मटका चालवणाऱ्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याची भावना यावेळी दीपक मानकर यांनी व्यक्त केली.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पुजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम मातोळे, प्रवक्ते भैय्यासाहेब जाधव, शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, ॲड.पुष्कर दुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये