राष्ट्रीय
होम आयसोलेशन कालावधी आता इतक्या दिवस; केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य / लक्षणे नसलेल्या COVID-19 रूग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाला चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून किमान 7 दिवस ताप निघून गेल्यावर आणि सलग 3 दिवस ताप नसल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येईल आणि विलगीकरण समाप्त होईल. संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.







