कोथरुड

कोरोना संदर्भात शाळेमध्ये विद्यार्थांना मार्गदर्शन; कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचा उपक्रम              

कोथरूड : डहाणूकर कॉलनी मधील सरस्वती विद्यालय प्रशाला येथील विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभाग, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन करण्यात आले. Guidance to students in school regarding corona;  Initiative of Kothrud Bawadhan ward Office

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ अन्वये हा उपक्रम राबवण्यात आला. महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे व आरोग्य निरीक्षक सचिन लोकरे यांच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

IMG 20210116 WA0007

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनी वारंवार हात धुणे, शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा वापर करणे, आपले स्वास्थ्य खराब असल्यास त्वरित नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार घेणे, विद्यार्थ्यांनी कोणत्याही शालेय साहित्याची अदलाबदल करणे टाळावे, ताप सर्दी खोकला असल्यास एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेरुन खेळून आल्यावर स्वच्छ हात पाय धुणे, विद्यार्थ्यांनी घरूनच जेवण करून येणे व स्वतःची पाण्याची बाटली आणणे, शालेय परिसरात सामाजिक अंतराचे भान ठेवणे, घरून शाळेत येताना आपल्या दप्तरामध्ये हात धुण्यासाठी छोटासा साबण तसेच सॅनिटायझरची बॉटल जवळ ठेवणे, अशा सूचना करतानाच शाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगण्यात आले.

कोविड १९  स्कुल रेडीनेस प्रकल्पा अंतर्गत  शाळा सुरू करण्यासाठी कोरोना प्रतिबंध लागणारे साहित्य  कोथरूड मधील सरस्वती विद्यालय प्रशाला शाळेमध्ये देण्यात आले. त्यामध्ये सामाजिक अंतर मार्किंग, पाण्यासाठी पूट ऑपरेटर टॅब, हात धुण्यासाठी लोप, सूचना फलक, सॅनिटायझर स्टँड असे साहित्य देण्यात आले.  सदर कार्यक्रमास मोकादम आण्णा ढावरे, जनवाणी संस्थेचे हेमंतकुमार नाईक, समीर आजगेकर, जयश्री पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा जगदाळे, आणि शिक्षक अमृता यादवाड, गणपत जाधव, महेश नलावडे उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close