पुणे शहर

आणीबाणी काळात तुरूंगवास पत्करलेल्या नागरिकांचा कोथरूड मध्ये सन्मान..

आणीबाणी काळातील अनुभव कथनातून उपस्थितांसमोर उभी राहिली त्यावेळची परिस्थिती

देशासाठी स्वत:ला संघर्ष होमात झोकून देणाऱ्यांचा सन्मान करणे माझ्यासाठी सौभाग्याचे : मुरलीधर मोहोळ

कोथरूड : आणीबाणीत लोकशाही शाबुत राहण्यासाठी लढा देऊन तुरूंगवास पत्करलेल्या नागरिकांचा सन्मान सोहळा कोथरूड मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेकांनी आणीबाणी काळात घेतलेल्या अनुभवांचे कथन करताना त्यावेळची परिस्थिती उपस्थितांसमोर उभी केली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष व प्रवक्ते माधव भंडारी, चर्चा प्रतिनिधी विनायक आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी माजी नगरसेवीका वासंती जाधव, हर्षाली माथवड,  कोथरूड मंडलचे अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे भाजपा सचीव निलेश कोंढाळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते नाना नाशिककर, शाम सातपुते, सुभाष जेऊर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, आपल्या कुटुंबाचा विचार न करता देशासाठी स्वत:ला संघर्ष होमात झोकून देणाऱ्या या सर्व जनांचा सन्मान करणे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे. तसेच पिडा यातना भोगलेल्यांचे अनुभव नव्या पिढीला समजावे ही देखील या कार्यक्रमाची रूपरेखा असल्याचे मोहोळ म्हणाले.

विनायक आंबेकर यांनी त्यांचे आणिबाणीचे अनुभव, घडलेला तुरूंगवासाचे कथन केले तसेच हा सन्मान सोहळा आयोजीत करून आणिबाणी शोशीकांचे स्मरण ठेवल्याबद्दल मुरलीधर मोहोळांचे विशेष कौतुक केले.

माधव भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आणिबाणीच्या काळात पत्रकार म्हणून काम करत असतांना आलेल्या मर्यादा व त्याचा सामना करतांना येणाऱ्या अडचणींचे किस्से सांगितले. इंदिरा गांधी सरकारच्या अन्यायामूळे आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकीत कॉग्रसचा दारूण पराभव होणे ही त्यावेळची जनभावना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०१४ च्या निवडणूकीत देखील अशाच जनभावनेने घराणेशाही सरकारला खाली खेचल्याचे भंडारी म्हणाले. माजी नगरसेविका अनुपमा लिमये यांनी वडिल सरकारी नोकरीत असतांना देखील आणिबाणीला केलेला विरोध व भोगलेला तुरूंगवास तर  अशोक नाफडे यांनी भूमीगत कारवायांचे अनुभव कथन केले.

यांच्यासोबतच सुमारे १६० पेक्षा जास्त नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जाधव यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश माथवड यांनी केले.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये