व्हायरल व्हिडिओ

VIDEO : ‘रील’चे वेड तरुणाच्या अंगलट; धबधब्यात वाहून गेला

पुणे/हुबळी : रील्स हा तरुणाईचा आवडता प्रकार. हेच रील्सचे वेड तरुणांसाठी घातक ठरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रील्स बनविण्यासाठी हे तरुण अनेकदा निसर्गरम्य ठिकाणी, धबधब्यावरही जातात. कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधबा दक्षिण भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तरूणांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.

Screenshot 2023 07 17 18 08 38 30

या धबधब्यात एक व्यक्ती रील बनवताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. हा व्यक्ती धबधब्यामध्ये असलेल्या एका दगडावर उभा राहिला होता. तर पाठीमागे असलेली व्यक्ती त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. अचानक या व्यक्तीचा पाय घसरला आणि तो वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला. इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी अनेक जण धोकादायक मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे अशा धबधब्याच्या ठिकाणी बंदी घालण्याची मागणी काहीजण करत आहेत. तर हे साहसी पर्यटन असल्याचे सांगत काहीजण याला विरोध करत आहेत. अनेकदा बंदी असतानाही धोकादायक ठिकाणी पोलिसांना न जुमानता पळवाटा शोधत पर्यटक जात असल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये