पुणे शहर

स्वानंद समुद्र यांच्याकडून २०० वेळा प्लेटलेट्स दान

स्वानंद समुद्र यांचा रुपेश तुरे यांच्या हस्ते सत्कार

पुणे : २०० वेळा प्लेटलेट्स दान करणाऱ्या स्वानंद समुद्र यांचा स्वारगेट येथील जनकल्याण पेढीमध्ये सत्कार करण्यात आला. तावरे कॉलनी येथे राहणारे स्वानंद समुद्र यांनी १९९५ पासून आतापर्यंत दोनशे वेळा प्लेटलेट्स दान केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते रुपेश तुरे यांच्या हस्ते समुद्र यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रुपेश तुरे म्हणाले की, समुद्र यांनी २०० वेळा प्लेटलेट्स दान करून समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे. सध्या चालू असलेल्या कोविड १९ सारख्या आजारावर मात करण्यासाठी प्लेटलेट्सची खूप मदत झाली आहे.

अजूनही आपल्या समाजात रक्तदान किंवा प्लेट्सलेट दान कण्यासाठी म्हणावी तशी जागृकता नाहीये. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लेटलेट्स व रक्तदान करून समाजबंधूंचे प्राण वाचवावेत.” असेही ते म्हणाले.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये