विविध संस्था, संघटनांकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना १९१व्या जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे : अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना १९१व्या जयंतीनिमित्त खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सारसबाग पुणे समोरील स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच संस्थेच्या२०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार वंदना चव्हाण यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकातील फुलांची सजावट प्रत्येक वर्षी शिक्षण संस्थेतर्फे केली जाते.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ , उपमहापौर सुनिता वाडेकर माजी आमदार दीप्ती चवधरी ,माजी उपमहापौर सरस्वती शेडगे, मुख्य विश्वस्त पदमकांत कुदळे ,अध्यक्ष दिलीप राऊत, सरचिटणीस प्रशांत एकतपुरे ,विश्वस्त प्रकाश लोंढे, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेच्या चेअरमन स्मिता लडकत ,नगरसेविका मनीषा लडकत, रुपाली धाडवे ,स्मिता वस्ते ,नगरसेवक अजय खेडेकर तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य शारदा लडकत ,भीमराव जैवळ, धर्मराज मेहेत्रे ,सुधीर पैठणकर ,विनोद बनकर,रघुनाथ ढोक, कैलास काठे, नाना कुदळे, गुलाब माळी ,हनुमंत टिळेकर, रमाकांत दरवडे ,तसेच इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन



अनंत अडचणींवर मात करत स्त्री शिक्षणाचा पाया रचून मुली, महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या आद्य शिक्षिका, महिलांना स्वावलंबी होण्याचे धडे गिरवायला शिकवत क्रांतीची ज्योत पेटवून, चूल आणि मूल याव्यतिरिक्त महिलांचा भिडे वाड्यात शिक्षण वर्ग घेणार्या सावित्रीआईंना शिवसेना पुणे शहराचे वतीने पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले वाड्यात विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, उपशहरसंघटक उमेश गालिंदे, विभागप्रमुख चंदन साळुंके, संदिप गायकवाड, रूपेश पवार, सागर पेटाडे, अनंत घरत, देवेंद्र शेळके, हर्षद ठकार, आकाश गायकवाड, गणेश गुंजाळ, युवासेना उपाध्यक्ष युवराज पारिख, निलेश जगताप, महिला आघाडीच्या प्रज्ञा लोणकर व अनेक छोट्या सावित्रीच्या लेकी उपस्थित होत्या.
मुलींची 1 ली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीतर्फे सावित्रीच्या लेकींनी साजरा केला स्त्री शिक्षण गौरव दिन
पुणे : भिडे वाडा येथे मुलींच्या पहिल्या शाळेचा 173 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींच्या पहिल्या शाळेचा हा स्थापना दिवस स्त्री शिक्षण गौरव दिवस साजरा म्हणूनही करण्यात आला.



भारतात स्त्री शिक्षणाची पहाट सावित्रीबाई व जोतीराव फुले व फातिमा शेख यांच्यामुळे झाली. समाज करीत असलेला अपमान, वाळीत टाकणे, शेण फेकणे अशा कुठल्याही प्रकारच्या त्रासाला न जुमानता मुलींची शाळा त्यांनी सुरू ठेवली. त्यांच्या प्रयत्नाने 1 जानेवारी 1848 साली मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. त्याची सुरवात भिडे वाडा इथे झाली. याचे औचित्य साधून मुलींची 1 ली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीने 1 जानेवारी 2022 रोजी भिडे वाडा येथे सकाळी 9 वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन



क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी नगरसेविका वैशाली मराठे, लता राजगुरू, रफिक शेख, सुजाता शेट्टी, यासिन शेख, अस्लम मिरजकर, प्रशांत सुरसे, सुंदर लोहार, राजेंद्र भुतडा, राजश्री अडसूळ, ज्योती परदेशी, राधिका मखामले, कल्पना उनवणे, पौर्णिमा भगत यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



