शैक्षणिक

पैसे घेऊन बनावट पदव्या विक्रीचा धंदा; कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे/अहमदनगर : ‘भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यवसाय प्रबंधन अध्यायन संस्थान’ या नावाने अहमदनगर येथे पैसे घेऊन बनावट पदव्या विक्रीचा धंदा सुरू असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी काेथरूड पाेलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. 

अगदी काही हजारांपासून एक ते दाेन लाख रुपये द्या अन् हवी ती पदवी घेऊन जा, असा गाेरखधंदाच काही संस्थांनी थाटला असल्याचे यामुळे उघडकीस आले आहे. पुण्यात सन २०१८ मध्ये पुरंदर विद्यापीठ नावाने अनेक पदव्या विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. हे विद्यापीठ म्हणजे सासवडमध्ये तीन खाेल्या आणि एक शिपाई इतकेच मर्यादित हाेते. त्यांनी तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना बाेगस पदव्या वाटप केल्या हाेत्या. या तथाकथित संस्थेवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.

कशा ओळखाल बाेगस संस्था?

 अनेक संस्था पैसे घेऊन त्वरित पदवी देण्याचा दावा करतात किंवा पदव्या देतात, त्या १०० टक्के बाेगस असतात.

ज्या संस्थांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटी), विद्यापीठ अनुदान आयाेग (यूजीसी) यांच्याकडे नाेंद नसते. 

यूजीसी हे उच्च शिक्षणातील पदवी देते, तर एआयसीटी हे तंत्रशिक्षणातील पदवी बहाल करते. त्यांच्याकडे नाेंद नसलेल्या पदव्या देणाऱ्या संस्था बाेगस असतात.

बाेगस पदव्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने याआधीच परिपत्रके काढली आहेत. पैसे घेऊन पदव्या विक्री करणाऱ्या संस्था माहीत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांनी तत्काळ उच्च शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच काेणत्याही संस्थेत प्रवेश घेताना त्या संस्थेची शासकीय ध्येयधाेरणानुसार मान्यता, कागदपत्रांची पडताळणी करावी. त्यांची पूर्ण माहिती घ्यावी. जाहिरातीला बळी पडू नये. आमच्याकडे तक्रार आल्यास त्याची चाैकशी करून संबंधित दाेषी संस्थांवर कारवाई करण्यात येईल असे उच्च शिक्षण संचालक डाॅ. धनराज माने यांनी सांगितले आहे. 

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये