पुणे शहर

चतुःश्रृंगी, विद्यापीठ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण आता पाणी प्रश्न सुटेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये २४×७ पाणीपुरवठ्यासाठी आशानगर, चतुःश्रृंगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) पत्रकारांना दिली.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाणी समस्येबाबत आढावा घेण्यासाठी आमदार शिरोळे यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली. मतदारसंघातील पाणी समस्येबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली आणि लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

Img 20221228 wa00016208176808646242256

बैठकीत २४x७ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये २४x७ पाणीपुरवठा करिता आशानगर, संगमवाडी, चतुःश्रुंगी, पुणे विद्यापीठ, फर्गुसन कॉलेज, चिखलवाडी, मॅफको गोखलेनगर याठिकाणी पाण्याच्या टाक्या असून यामधील आशानगर, चतुःश्रुंगी, पुणे विद्यापीठ येथील टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या सुरु करण्यात येणार आहेत. तसेच राहिलेल्या पाण्याच्या टाक्यांचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
    
महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अनिरुद्ध पावसकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Img 20230707 wa00097391429386569165714
Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये