पुणे शहर

पुणे मनपा शिक्षण विभाग प्राथमिक यांचा आकृतिबंध शासनाने मान्य केल्यामुळे २१०० कर्मचाऱ्यांना न्याय : दिपाली धुमाळ

पुणे  : पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक व शिक्षकेतर पदांचे यापूर्वीची शासन मान्य पदे / मा. मनपा मुख्य सभा मान्य पदे यानुसार योग्य ते बदल करून सुधारित आकृतिबंध मे. महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचे मंजुरीस प्रस्तावित होता. हा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याने  2100 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याचा रस्ता मोकळा झाला असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

शासनाच्या वतीने हा निर्णय व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री. व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, पुणे जिल्हा यांनी घेतलेल्या पुढाकार घेतला असून महाराष्ट्र शासनाने आकृतिबंध मंजूर केल्याने 2100 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. 

Img 20210707 wa0004

शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेत समायोजित झाल्याने आकृतिबंध बाबतची कार्यवाही नगरविकास विभागाच्या नियमानुसार होणे क्रमप्राप्त होते. पूर्वीची पदे व नंतरच्या काळात मुख्य सभेच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे याबाबत आता सुस्पष्टता आली आहे. या निर्णयामुळे शिक्षक भरती, बढती यांचाही वर्षोनुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. हा निर्णय व्हावा यासाठी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याकडूनही पाठपुरावा करण्यात आल्याचे दिपाली धुमाळ यांनी  सांगितले.

पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आता सुस्पष्ट व सुसंगत काम करण्यासाठी भरती व अन्य प्रक्रिया करून वेळोवेळी उचित निर्णय घेऊन कार्यवाही करेल अशी आशा आहे.  याविषयी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेताना मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल धुमाळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये