शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानाला ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबी कडून अटक ..

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत पार्टीत सहभागी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रात्रभर झालेल्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली आहे. आर्यन सह तीन जणांना एन सी बी ने ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांना आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार की, त्याला जमीन मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे. शनिवारी रात्री झालेल्या कारवाईनंतर आर्यन खानचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
एनसीबीने रात्रभर चौकशी करुन सगळ्यांचे जबाब नोंदवले आहेत.आर्यन खानसह तिघांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शाहरुख खान चे वकील कोर्टात दाखल झाले आहेत.




