राष्ट्रीय

रामदास आठवलेंचा शशी थरूर यांना ‘जोर का धक्का’; शोधल्या त्यांच्या इंग्लिशमधील चुका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार शशी थरुर आणि रिपब्लिकन पक्षाचे (आ) नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात इंग्रजीवरुन ट्विटवर वॉर रंगलं. शशी थरुर यांनी रामदास आठवले यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं. रामदास आठवलेंनी शशी थरुर यांच्या ट्विटमधील इंग्रजी शब्दातील स्पेलिंगमधील चुका शोधल्या आणि थरुर यांचं ट्विट रीट्विट करत खास अंदाजात उत्तर दिलं. यानंतर शशी थरुर यांनी ट्विट करत रामदास आठवलेंना उत्तर दिलं. थरुर यांनी ट्विट करताना थेट जेएनयूच्या नव्या कुलगुरू डॉ. शांतीश्री नव्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलिपुडी पंडीत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

शशी थरुर यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे एक छायाचित्र होते. त्यात रामदास आठवले मागे बसलेले दिसून येतात. थरुर म्हणाले की, बजेटवरील चर्चा दोन तास चालली. रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही सांगत आहेत. याशिवाय पहिल्या रांगेत बसलेल्या लोकांना देखील अर्थमंत्री करत असलेल्या दाव्यावर विश्वास होत नाही, असं थरुर यांनी म्हटलं होतं.

थरुर यांच्या टीकेला रामदास आठवले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. डिअर शशी थरुरजी, विनाकारण वक्तव्य करताना चुका होता. Bydet नसतं तर Budget असतं आणि rely नसून reply असतं आम्ही समजू शकतो, असं रामदास आठवले म्हणाले. खरंतर शशी थरुर हे नव्या आणि मोठ्या इंग्रजी शब्दांचा वापर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. मात्र, आठवले यांनी ट्विटवर त्यांना इंग्रजीचे धडे दिले.

रामदास आठवले यांनी चुका पकडल्यानंतर शशी थरुर यांनी ती मान्य केली. थरुर यांनी टायपिंग मिस्टेक असल्याचं म्हटलं. निष्काळजीपणे टायपिंग करणं हे खराब इंग्रजीपेक्षा मोठं पाप आहे. मात्र, तुम्ही शिकवत आहात तर जेएनयूमध्ये कोणीतरी आहे त्यांना तुमच्या शिकवण्याचा फायदा होईल, असं शशी थरुर म्हणाले. शशी थरुर यांचा इशारा हा जेएनयूच्या नव्या कुलगुरु शांतीश्री धुलिपुडी यांच्याकडे होता. पंडित यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्याकरणाच्या चुका होत्या ज्यामुळं त्या ट्रोल झाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये