मराठी चित्रपटाचे जितेंद्र आव्हाडांकडून मोफत शो

ठाणे : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्राचा शाहीर चित्रपटाकडे नेतेमंडळींचं लक्ष नसल्याची खंत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केदार शिंदेंच्या ट्विटला उत्तर देत, हा सिनेमा मोफत दाखवण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.
आम्ही ठाण्यात प्रभात टॉकिजला महाराष्ट्र शाहीर ह्या चित्रपटाचा शुक्रवार, शनिवार, रविवारी संध्याकाळी 7 वाजताचा शो लावला आहे. जाहीर आमंत्रण… मराठी वर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा शो विनामूल्य आहे. आपले संस्कार, संस्कृती आणि इतिहास आपल्याला माहीत असायलाच हवा, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
केदार शिंदे यांचं ट्विट
“दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?”, असे ट्विट केदार शिंदे यांनी केले होते.




