पुणे शहर

पाषाण- सुतारवाडी येथील दूषित पाणीपुरवठ्या विरोधात शिवसेनेचे पालिका उपायुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन

पुणे : पाषाण सुतारवाडी येथे महानगरपालिकेच्या दूषित पाणीपुरवठ्या  विरोधात  शिवसेनेच्यावतीने पुणे महानगर पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करत निवेदन देण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार,  गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, विधानसभा प्रमुख योगेश मोकाटे, विभाग संघटक संजय निम्हण, विभाग प्रमुख संतोष तोंडे, युवासेना पदाधिकारी अमित रणपिसे, राम थरकुडे,  दिनेश नाथ, ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Img 20210223 wa0156

गेले आठ महिने पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावेळी संजय मोरे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या केबिनमध्ये खाली बसून आंदोलन केले व लेखी आश्वासन  देण्याची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी तीन अभियंत्यांची  टीम तयार करून हा प्रश्न तातडीने सोडवण्याची येईल असे आश्वासन दिले आहे.

Img 20210313 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये