पुण्यातील १ ली ते ८ वी पर्यंतची शाळा ३० जानेवारी पर्यंत बंद – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबईनंतर आता पुणे शहरांतही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या हद्दीत 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष बंद ठेऊन ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण, मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबईनंतर आता पुण्यातीलही सर्व शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



