अफगाणिस्तानला भूकंपाचा धक्का, 26 जणांचा मृत्यू

काबूल : अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बादघिस प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यामुळे झालेल्या घरांच्या पडझडीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी मोजण्यात आली.
बाघिसचे गव्हर्नर मोहम्मद सालेह यांनी सांगितले की, कादीस जिल्ह्यात घराचे छत कोसळल्याने अनेक लोकांचा घराच्या ढिगाऱ्यात अनेकांचा मृत्यू झाला. याशिवाय इतरही अनेक लोक जखमी झाले असून त्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या 26 लोकांमध्ये पाच महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. तसेच आणखी चार जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे प्रांतातील मुकर जिल्ह्यातील रहिवाशांचेही नुकसान झाले. परंतु जीवितहानीसह तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, अशी माहिती देण्यात आली.







