पुणे शहर

उमेदवार निवडणूक लढवतो, पण तो जिंकतो तुमच्या घामावर, तुमच्या धावपळीवर, तुमच्या न थांबणाऱ्या जिद्दीवर-अमोल बालवडकरांचा कार्यकर्त्यांसाठी हृदयस्पर्शी संदेश 

पुणे :  पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक ९ (सुस-बाणेर-पाषाण) मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला संदेश कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना अक्षरशः भावुक करून गेला आहे. 

भाजप ने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्या नंतर भाजपमधून पक्षांतर करून राष्ट्रवादीत दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर यांचा हा संदेश केवळ राजकीय नाही, तर कार्यकर्त्यांच्या समर्पणाला, त्यांच्या घामाला आणि अथक जिद्दीला खरा दिलाचा सलाम आहे. संदेश वाचताना अनेकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले, तर काहींनी कमेंट्समध्ये “तुमच्यासाठी जीवाची बाजी लावू” अशा भावना व्यक्त केल्या.

Img 20251125 wa01782121520512185783132

अमोल बालवडकर आपल्या संदेशात म्हणतात, “अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सदस्य म्हणजे माझे कुटुंब.. या लढाईत माझ्या नावापेक्षा मोठं एकच सत्य आहे—तुमची मेहनत. उमेदवार निवडणूक लढवतो, पण तो जिंकतो तुमच्या घामावर, तुमच्या धावपळीवर, तुमच्या न थांबणाऱ्या जिद्दीवर.”ते पुढे त्यांच्या स्वतःवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करतात, पण तो अन्याय त्यांना कार्यकर्त्यांच्या खऱ्या ताकदीची जाणीव करून देतो. 

“माझ्यावर अन्याय झाला, हो. पण त्या अन्यायाने मला एक गोष्ट दिली—तुमच्या डोळ्यातला राग नाही, जिद्द दिसली. तुमच्या हातात थकवा नाही, हिम्मत दिसली. प्रत्येकाने मनाशी ठरवलंय की ‘आपण मागे हटायचं नाही.’ हेच खरं बळ आहे. दहा हत्तीचं नाही—शंभर हत्तीचं.”सकाळी लवकर उठून लोकांना भेटणारे, रात्री उशिरापर्यंत धावपळ करणारे, घरची सुख दुःख बाजूला ठेवून मैदानात उतरलेले कार्यकर्ते – हे सगळे बालवडकरांच्या डोळ्यांसमोर आहे. “हे सगळं ‘कुठल्या फायद्यासाठी?’ तर एका विश्वासासाठी—की आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि आपला प्रभाग बदलायचा आहे.

”अत्यंत भावुक शब्दांत ते कार्यकर्त्यांना आश्वस्त करतात: “एक लक्षात ठेवा ही मेहनत कधी वाया जाणार नाही. मी तुम्हा प्रत्येकाचा ऋणी आहे. तुमच्या परिश्रमांचं चीज होईल—हे वाक्य मी आश्वासन म्हणून नाही, खात्री म्हणून सांगतो. कारण तुम्ही फक्त प्रचार करत नाही आहात, तुम्ही इतिहास लिहित आहात.”शेवटी ठाम विश्वासाने ते म्हणतात, “विजय आपलाच होणार.”हा संदेश पोस्ट होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. अनेकांनी कमेंट्समध्ये बालवडकरांना पाठिंबा देताना त्यांच्या भावना उफाळून आल्या. भाजपने तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बालवडकरांच्या या संदेशाने प्रभागातील लढत आणखी तीव्र झाली आहे. अन्यायाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या या एकजुटीने आणि जिद्दीने विजय निश्चित आहे, असा विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत.

अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सामाजिक कार्य करणाऱ्या बालवडकरांचा हा संदेश केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, कार्यकर्त्यांच्या निष्ठेला आणि समर्पणाला खरी मानवंदना देणारा ठरला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हा संदेश राष्ट्रवादीच्या मोहिमेला नक्कीच भावनिक बळ देईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये