महाराष्ट्र

दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

दिवाळीतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाडवा अर्थात बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेच्याच दिवशी महाराष्ट्रात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. नवीन लग्न झालेल्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक मुहूर्ताचा दिवस आहे.

Img 20231111 wa0004281293263544100257595665

नवीन लग्न झाल्यानंतर त्या वर्षी येणारी पहिली दिवाळी विशेष असते. मुलीच्या माहेरी हा दिवाळसण साजरा करतात. जावयाला विशेष मान देऊन आहेर केला जातो. दिवाळी पाडव्याला पहाटे पत्नी त्याच्या पतीला सुगंधी तेल लावून, उटणं लावून स्नान घालते. संध्याकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून काही तरी भेटवस्तू देतो.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी कायम नांदावी, नात्यातला गोडवा कायम राहावा आणि पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी औक्षणाची पद्धत आहे. तसंच घरातल्या अन्य पुरुषांनाही त्यांची पत्नी या दिवशी ओवाळते. फटाके वाजवले जातात. गोडधोड केलं जातं. मुलीच्या सासरकडच्यांना माहेरी जेवायला बोलावण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. अनेक जण या दिवशी आवर्जून सोनं खरेदी करतात. रांगोळ्या काढल्या जातात, पणत्या लावल्या जातात.

Img 20231114 wa00044806228445292347193

शक्ती आणि संपत्तीने प्रचंड मोठ्या झालेल्या बळीराजाला नमवण्यासाठी भगवान विष्णू आले. त्यांनी वामनावतार धारण करून तीन पावलांमध्ये बळीराजाकडे भूदान मागितलं. वामनाच्या तीन पावलांमध्ये सारं विश्व व्यापलं गेल्यामुळे बळीराजा पाताळात गेला. बळीराजाचा (Baliraja) दानशूरपणा पाहून विष्णूंनी त्याला वर दिला. ‘कार्तिक प्रतिपदेला तुझं स्मरण करून तुझी पूजा केली जाईल. जो कोणी या दिवशी दीपदान करेल, त्याला यमयातना भोगावी लागणार नाही आणि त्याच्याकडे सदैव लक्ष्मीचा वास राहील,’ असं वरदान विष्णूंनी बळीराजाला दिलं. त्यामुळे या दिवशी काही ठिकाणी बळीराजाचं त्याची पत्नी विंध्यवलीसह चित्र किंवा रांगोळी काढून पूजा केली जाते.

Fb img 16999246180938193698675347942483

‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. भगवान विष्णूंनी बळीराजाला नमवल्यानंतर लक्ष्मीला त्यांचं कौतुक वाटलं आणि तिनं त्यांचं औक्षण केलं. भगवान विष्णूंनी ओवाळणी म्हणून लक्ष्मीचं तबक हिरेमाणकांनी भरून टाकलं असं म्हणतात. त्याचीच आठवण म्हणून पत्नी या दिवशी पतीचं औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी घालतो. काहीजण या दिवशी वस्त्र आणि दिव्याचं दान देतात.

Fb img 16997545332478063009632470005805

कार्तिक शुद्ध प्रतिपदेला विक्रम संवत्सराची सुरुवात होते. उज्जैनचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं. त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत्सर ही कालगणना सुरू केली. या दिवसाबद्दल आणखी कथाही प्रसिद्ध आहे. पार्वतीने शंकरांना या दिवशी द्युतात हरवलं होतं. त्यामुळे काही ठिकाणी या दिवशी द्यूत किंवा आता काळानुसार पत्ते खेळण्याचीही प्रथा आहे.

Fb img 16997796665812736881535248315558

दिवाळी पाडवा हा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. याच दिवशी व्यापाऱ्यांचं नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. हिशेबाच्या नव्या वह्यांची हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात करतात. त्यांच्या जमाखर्चाच्या नवीन वह्या वापरायला याच दिवसापासून सुरुवात होते.

Img 20231114 wa00092140574538690956729

दिवाळीपर्यंत नवीन पिकं हाती आलेली असतात. त्यामुळे दिवाळी हा शेतकऱ्यांसाठी विशेष आनंदाचा सण असतो. दिवाळी पाडव्याला पहाटे ग्रामीण भागात शेतकरी डोक्यावर घोंगडी घेऊन शेतात जातात आणि दिवा लावतात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.

Img 20231112 wa00084245679956121736894
Fb img 16997856846731842935112977471072
Img 20231112 wa00131228884357653556833
Img 20231112 wa00072576930588635310622
Img 20231114 wa00121248177798465935053
Img 20231114 wa00148879311630779914825
Img 20231114 wa00087295975697319945281
Img 20231114 wa00012397221214428308596
Fb img 169979232846028756813723168556
Img 20231112 wa0029506383627803066877
Digital 20231112 123519 00006696680381270481811
Img 20231114 wa00276514751654342413197
Img 20231112 wa0018281295171501436526047055
Img 20231111 wa00138990855750371916874
Img 20231112 wa00068214416706074968579
Img 20231112 wa00193038845121130085932
Fb img 16999466200026335751744351201167
Img 20231114 wa00185416920054445765296
Wp image8585990092691348834
Img 20231114 wa00268814720820238994920

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये