कोथरुड मधील श्रीकृष्णनगर, सागर काॅलनी येथील नाल्याच्या कडेने होणार सीमाभिंत ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

नगरसेविका अल्पना वरपे यांच्या प्रयत्नांतून महापौर विकास निधितीतून सिमाभिंतीच्या कामासाठी निधी उपलब्ध
कोथरुड : कोथरुड मधील श्रीकृष्णनगर, सागर काॅलनी, शास्त्रीनगर स्मशानभूमी या परिसरातील घरांमध्ये पावसाळ्यात नाल्याचे पाणी घुसण्याचे प्रकार घडत असल्याने नाल्याच्या कडेने सीमाभिंत बांधणे गरजेचे बनले होते. त्यामुळे नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांनी प्रयत्न व पाठपुरावा करून महापौर विकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी या कामासाठी मान्य करून घेतला असून आज या नाल्याच्या कडेने सिमाभिंत उभा करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. Bhumi Pujan at the hands of Chandrakant Patil for the construction of the boundary wall along the nallah at Sagar Colony, Shrikrishnanagar, Kothrud
मागील पावसाळ्यात या नाल्याला आलेल्या पुराचे पाणी श्रीकृष्णनगर, मोहोळ चाळ, लाल बहादूर शास्त्रीनगर परिसरातील घरांमध्ये शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार रात्री उशिरापर्यंत थांबून वरपे यांनी मनपाच्या यंत्रणांद्वारे शक्य ती मदत येथील नागरिकांना केली होती. पाटील यांनीही महापौरांशी बोलून या बाबत उपाययोजना करण्यास सांगितले होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही दुसर्या दिवशी सदर नाल्याची पहाणी केली होती. त्यानंतर नगरसेविका अल्पन वरपे यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करून सदर सिमाभींती करिता रू.५० लक्ष निधी महापौर विकास निधीतून मान्य करून घेतला व त्यामुळे अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर आज मार्गी लागला आहे.

याउद्घाटन प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन व इतर विकासकामे करणे हे तर नगरसेवकांचे काम आहेच पण त्याच बरोबर वस्ती विभागातील आपल्या नागरिकांना मेडीकल सुविधा, बेरोजगारी व इतर बाबतींमध्ये देखील प्रभागाचे पालक या नात्याने आपण नेहमी मदत केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. मोहोळ यांनी सदर कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन यावेळी दिले. नगरसेविका अल्पना वरपे यांनी निधीची उपलब्धता केल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांचे अभार मानले व नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी व सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील,नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे, कोथरूडचे सहाय्यक उपायुक्त संदिप कदम, कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी, प्रदेश युवामोर्चा चिटणीस अॅड गणेश वरपे, स्विकृत सदस्य विलास मोहोळ, बाळासाहेब टेमकर, आरपीआय चे केशव पवळे, गायत्री काळभोर, सुप्रिया माझिरे, अमरजा पटवर्धन, गायत्री सणस, ज्वाला पवार, सुहासिनी शिराढोणकर, अंजनाताई शेंडगे, भाजप पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे यांनी सूत्रसंचालन केले व सागर कडू यांनी आभार मानले.



