महाराष्ट्र

सुरजागडमध्ये नक्षलवाद्यांकडून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावरील वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : सुरजागड प्रकल्प बंद करावा या मागणीसाठी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र हद्दीतील धोडराज ते इरपनार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावरील वाहनांची जाळपोळ नक्षलवाद्यांनी केली आहे. गावात बॅनर लावून, पत्रके टाकून नक्षलवाद्यांनी सुरजागड प्रकल्प बंद करण्याची मागणी केली आहे.

मागील काही दिवसांपासून भामरागड तालुक्यात धोडराज ते इरपनार या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर असलेल्या जवळपास 20 वाहनांची 21 जानेवारी रोजी भर दुपारच्या सुमारास जाळपोळ केल्याची घटना घडली. जाळपोळ केलेल्या वाहनात 15 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 1 ग्रेडरचा समावेश आहे.

एका कंत्राटदारांकडून पेटी कॉन्ट्रॅक्टने काम घेऊन अन्य कोणीतरी काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 11 जानेवारी रोजी भामरागड तालुक्यातील नारगुंडा जंगल परिसरात दोन वन रक्षकांना नक्षल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. आज पुन्हा त्याच तालुक्यात रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Img 20220118 wa0213
Img 20211231 wa00066164473394770712000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये