राष्ट्रीय

राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मोर्मू यांना भाजपकडून उमेदवारी

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून द्रौपदी मोर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बोर्डाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीनंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली.

Img 20220521 wa0000

मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत. एनडीएकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असावा, यासाठी जवळपास २० नावांवर चर्चा सुरू होती. भाजपाने घटक पक्षांशी संवाद साधल्यानंतर द्रौपदी मोर्मू यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे. याबाबतची माहिती जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यूपीएने राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार घोषित केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

द्रौपदी मोर्मू यांनी शिक्षिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्या ओडिसा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या. तसेच त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलं आहे. २०१५ ते २०२१ या कालावधीत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.

Img 20220610 wa0330

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये