महाराष्ट्र

हनुमान चालीसानं पाण्याचा प्रश्न सुटेल का? संतप्त ग्रामस्थांचा नवनीत राणांना सवाल

अमरावती : मेळघाट परिसरात पाच डोंगरी , कोयलारी, कटकुंभ आणि चूरणी या गावात उघड्या विहिरीतलं दूषित पाणी प्यायल्याने २३१ जणांना अतिसाराची लागण झाली असून या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. गावकरी पितात तेच पाणी त्यांना प्यायला दिले तेव्हा त्या गावकऱ्यांवर भडकल्या. ते काय फक्त हनुमान चालिसा वाचण्यासाठीच आहेत का? हनुमान चालिसा वाचून कोणत्या समस्या सुटत नाहीत असे ठणकावून सांगत जमिनीवर येऊन काम करा असा सल्ला गावकऱ्यांनी यावेळी त्यांना दिला.

एका सामाजिक कार्यकर्त्यांने राणा यांनी दुषित विहिरीतले पाणी राणा यांना पिण्यास दिले. त्यावेळी त्या संतापल्या. गावातील विहिरीतले पाणी प्यायला त्यांनी नकार दिला. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी ते काय फक्त हनुमान चालिसा वाचण्यासाठीच आहेत का? हनुमान चालिसा वाचून कोणत्या समस्या सुटत नाहीत असे ठणकावून सांगत जमिनीवर येऊन काम करा, असा सल्ला दिला.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये