पुणे शहर

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्या मदतीसाठी निर्बंधात बदल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणे : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्या मदतीसाठी निर्बंधात बदल करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.Municipal Commissioner promises to change restrictions to help senior citizens, the disabled

ब्रेक द चेन प्रतिबंध आणि लसीकरण या संबंधात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन आमदार शिरोळे यांनी आज ( शुक्रवारी ) सकाळी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीयदृष्टया त्रासलेले आणि दिव्यांगांच्या मदतीसाठी घरगुती परिचारिका, मोलकरीण, काळजीवाहूंना (केअर टेकर ) शनिवारी आणि रविवारीही परवानगी दिली जाईल. घरपोच अन्न सेवेच्या कालावधीत बदल केले जातील. याबाबत राज्य सरकारशी सल्लामसलत चालू असून राज्य शासन लवकरच नवीन आदेश काढेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Img 20210223 wa0156

तसेच, दळवी हॉस्पिटल, डॉ.आंबेडकर कॅन्टोन्मेन्ट जनरल हॉस्पिटल, औंध येथील शेवाळे हॉस्पिटल, औंध कुटी रुग्णालय येथील लसीकरण केंद्रांना आमदार शिरोळे यांनी भेटी देऊन व्यवस्थेची पहाणी केली.

Img 20210408 wa0012

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये