आरोग्य

कशी केली कोरोना रुग्णावर पायाच्या हाडाची शस्त्रक्रिया

पुणे : मागच्या आठवड्यात ऑयस्टर आणि पर्ल(Oyster and Peral) रूग्णालयात अपघातामुळे पायाचे हाड तुटल्याने एक रूग्ण ॲडमीट झाला होता. शस्त्रक्रियेसाठी तपासण्या केल्यानंतर त्याला कोरोना चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. या रुग्णाला कोरोनातून बरा करून त्याच्यावरील पायाच्या हाडाची शस्त्रक्रिया ही यशस्वीपणे करण्यात आली.

संबधित रुग्णाची शस्त्रक्रियेसाठी एक्सरे व रक्तातील व इतर तपासण्या केल्या असता त्याला कोरोना संसंर्ग झाल्याचे दिसले. एकीकडे पायातील हाड मोडलेले होते तर दुसरी कडे कोरोना संसंर्ग….अशा प्रसंगी योग्य ती कोरोना व्हायरस प्रतिबंध काळजी घेतली व तो रूग्ण कोरोना मधून बरा झाला व नंतर त्याच्या पायातील हाडावर योग्य ती शस्त्रक्रिया करण्यात आली.

ही शस्त्रक्रिया डाॅ. सचिन नागापूरकर अस्थीरोग तज्ञ ह्यांनी केली. भूलतज्ञ म्हणून डाॅ. क्षमा तर फिजीशियन डाॅ. नितिन पाटील यांची मदत झाली. कोरोना संसंर्ग झाला तर अजिबात घाबरू नका..लवकरात लवकर आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान व लवकर उपचार सुरू केले तर निश्चितच कोरोना व्हायरस संसंर्ग बरा होतो असे डॉ नागापूरकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये