पुणे शहर

नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात ; वनाज ते गरवारे मेट्रो चाचणीही लवकरच

पुणे : पुण्याच्या पश्चिम भागाच्या सुरळीत वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या कर्वेरस्त्यावरील नळ स्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो अधिकारी, नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन आढावा घेतला.  येत्या काही महिन्यात दुहेरी उड्डाणपूल आणि वनाज ते गरवारे कॉलेजदरम्यानची मेट्रो चाचणी घेण्यासंदर्भातील सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.(Work on the double flyover at Nalstop is in the final stages; Vanaj to Garware Metro test also early)

मोहोळ म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्याकडे असताना आपण या दुहेरी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय या कामाला गती यावी यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरु होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच काम पूर्ण होऊन वाहतूक सुरु होऊ शकेल.

Img 20210516 094854

महामेट्रोचे श्री. अतुल गाडगीळ, श्री. गौतम बिऱ्हाडे, स्थानिक नगरसेवक श्री. दीपक पोटे, श्री. जयंत भावे, माधुरीताई सहस्रबुद्धे, मंजुश्रीताई खर्डेकर, महापालिका सहायक आयुक्त श्री. तामखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

Img 20210521 wa0019

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये