पुणे शहर

कसबा पोट निवडणूक: थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार ; कसबा काँग्रेसला तर चिंचवड राष्ट्रवादीला

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटला आहे. तर चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर चिंचवडमधून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना मैंदानात उतरवण्यात आले आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Fb img 1647413711531 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये