महाराष्ट्र

महिला दिनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान

सांगली : औक्षण करण्याची परंपरा बहुतेक वेळा महिलांकडूनच पार पाडली जाते. परंतु, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रूढ पायंडाच बदलत चक्क स्वतः विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला.

या हृदयस्पर्शी क्षणामुळे उपस्थितांच्या मनात आदर आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. निमित्त होते सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन, सांगली व शासकीय तंत्रनिकेतन, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नारीशक्ती संवाद कार्यक्रमाचे.

राज्य शासन महिला सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे, हे सांगताना त्याची प्रचिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या छोट्याशा कृतीतून दिसून आली.

Img 20260222 wa00068837990397295942859
Img 20260305 wa03081177892995602408429
Fb img 17722786558115856474783028037709

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये